रामटेक :- रामटेक पोलीस पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारद्वारे माहिती मिळाली की, मौजा खुमारी येथे प्रकाश कामडे, रा. खुमारी याने त्याच्या शेतातील घरामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला सुगंधित तंबाखु विकी करीता साठा करून ठेवला आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मौजा खुमारी येथे आरोपी कं १) प्रकाश कामडे, वय ४५ वर्षे, रा. खुमारी याच्या शेतात जावुन पंचासमक्ष आरोपीच्या घराची घरझडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुंगधीत तंबाखु मिळुन आला..
पोलीसांनी पंचासमक्ष एकुण ३०० किलो प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु, टिन पॅकींग मशिन, प्लास्टीक व कागदी पैंकीग चे साहीत्य असा एकुण किंमती ५,५३,६५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपी कं २) आशिष रोकडे, रा नागपुर याने सदर मशिन, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुचा आणि साहीत्याचा पुरवठा केला असुन हे साहीत्य त्याचेच मालकीचे असल्याची माहीती प्राप्त झाली.
नमुद आरोपीने सदर प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु मानवी जिवीतास अपायकारक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने त्याचे उप्तादन, विकी, साठा व वाहतुकीवर प्रतिबंध लावलेला आहे हे माहीती असतांना सुध्दा प्रतिबंधीत अन्नपदार्थाची विकी करण्याच्या हेतुने साठा केला होता. आरोपी प्रकाश कामडे, वय ४५ वर्षे, रा. खुमारी आणि आशिष रोकडे रा. नागपुर यांचेविरूद्ध पोस्टे रामटेक येथे कलम २६(१),२६(२), (iv) २७ (३) (e), ३०(२) (a),३(१)(zz) (iv), ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधि. २००६ सहकलम १२३, २७४, २७५, २२३ भारतीय न्याय अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.