spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

केईएम, नायर, कूपरमध्ये जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य विभाजन – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबई :- मुंबईतील केईएम, नायर आणि कूपर रुग्णालयात जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य विभाजन (सेग्रिगेशन) व प्रक्रिया यावर भर देण्यात आला असून या रुग्णालयात सेग्रिगेशनची प्रक्रिया व्यवस्थित सुरू असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, शासकीय रुग्णालयांमध्ये पर्यावरणपूरक आणि आधुनिक सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईतील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन व पर्यावरणीय निकषांचे पालन होण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात आहे.

महापालिकेच्या रुग्णालयात ईटीपी, एसटीपी प्रकल उभारणीबाबत प्रशासनाकडून सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानंतर याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल असेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Popular Articles