जि प व पंचायत समिती निवडणूक अंतिम आरक्षणाची प्रसिद्धी

0
58

यवतमाळ :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अंतिम आरक्षण प्रसिद्धी आज करण्यात आली. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अंतिम आरक्षणाची अधिसूचना जारी केली. त्यानुसार सर्व तहसील कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समित्या येथील सूचना फलकावर, तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली आहे.