spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ;आतापर्यंत ७८,४८१ शेतकऱ्यांना ६६९ कोटी रुपये वितरित

– दुसऱ्या टप्प्यात ३४,८२४ शेतकऱ्यांच्या खात्यात २९५ कोटी

यवतमाळ :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंअंतर्गत दुसऱ्या टप्प्याचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरीत सोमवारी करण्यात आले. यामध्ये राज्यातील ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांना ५०८६ कोटी रुपये तर यवतमाळ जिल्ह्यातील ३४ हजार ८२४ शेतकऱ्यांच्या खात्यात २९५ कोटी ५८ लाख रुपये वितरित करण्यात आले आहे.

राज्यात आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतील १२ लाख ५८ हजार २४३ पात्र शेतकऱ्यांना १०,११५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत दोन टप्प्यात ७८ हजार ४८१ पात्र शेतकऱ्यांना ६६९ कोटी ९० लाख रुपये वितरित करण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ४३६०२ शेतकऱ्यांना ३४९ कोटी

या शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ३१,६२१ शेतकऱ्यांना २५३ कोटी ८२ लाख व दुसऱ्या टप्प्यात ११,९७१ शेतकऱ्यांना ९५ कोटी ७७ लाख रुपये असे एकूण ४३६०२ शेतकऱ्यांना ३४९ कोटी ६० लाख रुपये वितरित करण्यात आले आहे.

राष्ट्रीयीकृत व महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या ३४,८७९ शेतकऱ्यांना ३२० कोटी

पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयीकृत व महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या १२,०१६ शेतकऱ्यांना १२० कोटी ४८ लाख व दुसऱ्या टप्प्यात २२,८६३ शेतकऱ्यांना १९९ कोटी ८१ लाख रुपये असे एकूण ३४,८७९ शेतकऱ्यांना ३२० कोटी २९ लाख रुपये वितरित करण्यात आले आहे.

याप्रमाणे आतापर्यंत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व राष्ट्रीयीकृत आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतील एकूण ७८४८१ शेतकऱ्यांना ६६९ कोटी ९० लाख रुपये वितरित करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विविध विभागाचे मंत्री व अधिकारी उपस्थित होते.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेच्या लाभामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी मदत होणार आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ मिळणार असून एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु आहे ”

– संजय राठोड, पालकमंत्री, यवतमाळ

“शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची प्रकिया गतीने सुरु असून या लाभामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची आधार ईकेवायसी प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे पात्रता यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या आधार सेवा केंद्रावर तातडीने ईकेवायसी करुन योजनेचा लाभ घ्यावा.”

– विकास मीना, जिल्हाधिकारी


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.