कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मरार टोळीत एका मेडिकल स्टोर्स जवळ गुप्तचर पद्धतीने सूरु असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्ती झाल्याची कारवाई काल रात्री 9 वाजता झाली असून या धाडीतून 52 तास पत्ते, सात जुगारी व त्यांच्याकडून नगदी 2580 रुपये व महागडे 5 मोबाईल असा एकूण 52 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
कायदेशीररित्या गुन्हा दाखल केलेल्या या सात जुगाऱ्यात विजय रामरतन तडसे वय 36 वर्षे रा येरखेडा कामठी,सोनू राम माटे वय मरारटोळी ,मुकेश श्यामराव टिकाबास वय 36 वर्षे रा मरारटोळी,संजय चंद्रभान तलमले वय 40 वर्षे रा न्यू येरखेडा, विलास अशोक माने वय 39 वर्षे रा मरारटोली,रोशन भास्कर हलमारे वय 32 वर्षे रा न्यू येरखेडा कामठी असे आहेत.








