spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्थागुअ शाखा नागपुर ग्रामिण जुगार अड्यावर धाड

– सात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

– मोबाईल, दुचाकीसह २ लाख १० हजार ९५० रू. चा मुद्देमाल जप्त

 कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी परिसरातील कोळसा खदान नं.६ येथे स्थानिक गुन्हे शाखा, नाग पुर ग्रामीण पोलीस पथकाने जुगार अड्यावर धाड मारून अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना सात आरोपींना पकडुन त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून मोबाईल, दुचाकी वाहनासह २ लाख १० हजार ९५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुरूवार (दि.११) जुन २०२६ रोजी श्री हर्ष ए. पोद्दार, वरीष्ठ पोलीस अधीक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथ काने पोलीस स्टेशन कन्हान हद्दीतील टेकाडी शिवारा तील कोळसा खदान क्र.६ परिसरातील झाडीझुडपा मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्हान पोलीसासोबत संयुक्तरित्या कारवाई करत घटनास्थळी धाड टाकुन आरोपी १) विजय केवलदास गेडाम वय ४० वर्ष, रा. जे.पी. नगर, कामठी, २) मोहसिन मोविन शेख वय ३५ वर्ष, रा. मदन चौक, कामठी, ३) निलेश मुनेश नानेट वय ४० वर्ष रा. नया गोदाम प्रबुध्द नगर, कामठी, ४) मोबीदउर रहमान अब्दुल रशिद वय ३० वर्ष रा. लकडगंज काम ठी, ५) सुरज रघुवीर मेश्राम वय ३५ वर्ष रा. जुनी खला शी लाईन कामठी, ६) शारूख खान शमशेर खान वय ३० वर्ष, रा. कोळसा टाल कामठी, ७) सचिन प्रकाश यादव वय ३९ वर्ष, रा. वार्ड क. ०३ कन्हान यांना जागी च ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळतांना पकडले. पोली सांनी पंचाासमक्ष आरोपीतांच्या ताब्यातुन ५२ ताशपत्ते , एकुण रोख रक्कम ४०६०० रुपये, हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. एम.एच ३१ ए यु ८५९२, दरी, एलईडी लाईट आणि इतर साहीत्य असा एकुण २,१०,९५० रूपयांचा माल पंचासमक्ष जप्त केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.