कामठीत राजीव गांधी जयंती उत्साहात साजरी

0
46

कामठी २१ :- आधुनिक भारताचे शिल्पकार, देशाचे माजी पंतप्रधान व भारतरत्न स्व. राजीव गांधी यांची जयंती आज नगर काँग्रेस कमिटी कार्यालय गांधी भवन येथे नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश दुबे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी नगर परिषद माजी अध्यक्ष निरज यादव, प्रमोद मानवटकर, नगर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष लक्ष्मण संगेवार, काँग्रेस सेवादल अध्यक्ष नीतेश यादव, महिला काँग्रेस अध्यक्षा सुरैया बानो यांचेसह एम. ए. जब्बार, तौसीफ फैजी, राजू भागवत,  शाहीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात वक्त्यांनी स्व. राजीव गांधी यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी भारताला आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश घडवून दिला. दूरदर्शी नेतृत्व व प्रगतिशील विचारसरणीमुळे देशाला नवी दिशा मिळाली.

या वेळी  उबैद अफरोज,  अब्दुल सलाम अंसारी, प्रकाश लाइनपांडे, मनोज रंगारी, रायभान गजभिए, फिरोज खान, मंजू मेश्राम, चेतना गोडबोले, आशा गौरे, विभा मेश्राम, अंबिका रामटेके, नजमा बेगम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन दानिश कुरैशी यांनी केले. शेवटी सर्वांनी स्व. राजीव गांधींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली