spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान येथे राणी अवंतीबाई लोधी यांची जयंती उत्साहात साजरी

कन्हान :- मध्य भारतातील पहिल्या स्वातंत्र्य लढ्याच्या प्रणेत्या आणि रामगढच्या शूर राणी अवंतीबाई लोधी यांची १९५ वी जयंती राणी अवंतीबाई लोधी क्षत्रिय समाज पिपरी, कन्हान, सिहोरा व कांद्री व्दारे कन्हान शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

पिपरी येथील दुर्गामाता चौकात राणी अवंती बाई लोधी यांच्या प्रतिमेची पूजा, पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी राणीच्या जीवनावर प्रकाश टाकित मार्गदर्शन करण्यात आले. तदंतर भव्य रॅली राणी अवंतीबाई लोधी रोड, आंबेडकर चौक, जुने पोलीस स्टेशन गांधी चौकातुन महामार्गाने भारत माता चौक कांद्री शहरातुन फिरून तारसा रोड चौकातील हार्दिक गेस्ट हाऊस येथेपोहोचली. या रॅलीमध्ये, विशेषतः राणीच्या वेशात घोड्यावर स्वार झालेल्या मुली, डीजे वरील जीवनकथा, अल्हा गायन, शौर्यगाथा ही शहराच्या विशेष आकर्षणाची केंद्रे होती.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळा माजी जि प शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे यांच्या अध्यक्षेत तर प्रमुख अतिथी लोधी कल्याण महासभेचे अध्यक्ष लालसिंह ठाकुर, मुख्याध्यापक मोहन गिरिया, मोरेश्वर कुमोरिया, समाजसेवक मुन्नाजी वर्मा, माजी सभापती पारशिवनी मंगला निंबोने, माजी सभापती रामटेक नरेंद्र बंधाटे, माहुली सरपंच प्रेमचंद कुसुंबे, घाटरोहणा सरपंच किशोर बेहुणे, डॉ. सेवकराम बिलोने, मुलचंद शिंदेकर, गुरूदेव सेवा मंडळाचे चंद्रभान बिहुणे, महादेव लिल्लारे, राणी अवंतीबाई लोधी समाजाचे अध्यक्ष श्रावण वर्तेकर, उपाध्यक्ष केशरीचंद खंगारे आदी मान्यवरांच्या उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. लोधी समाजाचा इतिहास, समाजाची प्रगती आणि संस्थेच्या कार्याचा अहवाल विवेका क्षत्रिय यांनी प्रास्ताविकातुन सादर केला. सुत्रसंचालन सोनम वतेकर हयांनी तर आभार प्रेमलता छनिकर यांनी व्यकत केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मोहित वतेकर, जयकांत शांडीले, विधीलाल डहारे, अमित आकोने, भगवंत निंबोने, चंद्र हास पु-हे, ओमप्रकाश निंबोने, संतोष ठकरेले, शैलेश आकोने, सागर गेरवाल, नंदकिशोर लोधी, प्रजापती खंगारे, जितेंद्र वर्मा, सचिन खंगारे, विठ्ठल क्षत्रिय, दिने श लोधी, धर्मराज ठकरेले, भाऊराव लिल्लारे, राजेश क्षत्रिय, महेश लोधी, रोहित वतेकर, निहार लोधी, प्रकाश नागपुरे, सागर कोठेकर, रंजित शिंदेकर, किरण ठाकुर, नरेंद्र सोलंकी, दिपाली खंगारे, चंद्रकला मेहुणे, नंदिनी बघेले, कल्पना खंगारे, अर्चना लोधी सह पिपरी, कन्हान, सिहोरा, कांद्री सह परिसरातील गावातील समाज बांधवानी सहकार्य केले.

Popular Articles