spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जागतिक महिला दिना निमित्य रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्रा मार्फत विविध कार्यक्रम संपन्न

नागपूर :- शुक्रवारी 6 मार्चला, रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र, (लेडिज अँड जेन्ट्स) च्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्य व संस्थेच्या १० व्या, वर्धापनदिन निमित्ताने विभिन्न खेळ, व्याख्यान देऊन व्यसनमुक्ती मार्गदर्शन केले गेले. हा कार्यक्रम कल्पतरू नगर येथे केंद्राच्या प्रांगणात नुकताच संपन्न झाला. यावेळी विविध कार्यक्रम सुद्धा घेतल्या गेले. जसे महिलांचे खेळ, व्याख्यान, प्रश्न मंजुषा, लकी ड्रा आणि समूहनृत्य याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक निता ठाकरे महापौर (नागपूर महानगर पालिका) कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.संध्या पवार (संयोजिका पालकमैत्री), सह उदघाटक सरीता मते (जेष्ठ समाज सेविका), विशेष अतिथी वृंदा ठाकरे (राष्ट्रीय ओ.बी.सी. महिला महासंघाच्या शहर अध्यक्षा), प्रमुख अतिथी शरयू तायवाडे (कार्याध्यक्ष महिला राष्ट्रीय ओबीसी महासंघ), प्रमुख अतिथी मंगला शेशांक खेकरे (परिवहन सभापती, नगरसेविका प्र.क्र.34), तसेच संस्थेचे मार्गदर्शक गुणेश्वर आरिकर, प्रविण महाजन, टेमराज माले तसेच संस्थेचे संथापक सुरेश वांढरे यांची उपस्थित होती. पाहुण्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करित महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या कडून महिला व बालकांसाठी कायदे व योजना बद्द्ल माहिती दिल्या गेली. संस्थेच्यावतीने भव्य खेळांचे आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मोठया उत्साहाने सहभाग घेऊन बक्षिसे जिंकली. महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले ज्यात महिलांनी पैठणी जिंकल्यात, कल्पतरू नगरमधील महिलांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची प्रस्तावना संचालिका प्रांजली वांढरे (ताल्हन) यांनी केले. संचालन अनंत घुलक्षे यांनी केले तर आभार चांदणी कोरे यांनी मानले.

Popular Articles