नागपूर २९ : प्रभाग क्र. ५ मधील राजीव गांधी चौक ते जुना कामठी रोड जोडणारे रेल्वे फाटक दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी कायमस्वरूपी बंद केले होते. यामुळे शांतीनगर ते कामठी मार्गावरून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना, शाळेच्या बसेसना आणि नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत होती.
या गंभीर समस्येवर आम आदमी पार्टीचे प्रभाग अध्यक्ष किशन निमजे व प्रभाग सचिव हेमराज कुंभारे, प्रदीप पौनीकर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे व्यवस्थापक, आमदार, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली. तसेच फाटक तातडीने न उघडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता.
नागरिकांच्या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने अखेर सदर फाटक तात्काळ उघडले. फाटक पुन्हा सुरु झाल्याने परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. ठिकठिकाणी मिठाई वाटून समाधान व्यक्त करण्यात आले.
या महत्त्वाच्या कामासाठी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये भीमा बनसोड, राजेश पराते, डॉ. अमेय नारनावरे, रोशन डोंगरे, प्रशांत मेश्राम, राजू दुधे, अनिल जी. खोब्रागडे, मनोज फटिंग, सुमित शेंडे, उमाकांत गायधने, विजय नंदनवार, अनिल संभे, केतन ठाकूर, अश्फाक अहमद, कय्युम, जूझर, संदीप साखरे, शब्बीर, आतिक राहीन, उमाजी गजभिये, राजकुमार किताळीकर, नागोसे आदी मान्यवर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



