– महात्मा फुले शिक्षण संस्थेद्वारा आयोजित सर्वजातीय व धर्मीय पुनर्विवाहास ईच्छूक घटस्फोटीत, विधवा-विधूर आणि प्रौढांचा “पुनर्विवाह परिचय मेळावा” “पुनर्बध” -२०२६
– महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, रेशिमबाग चौक, नागपूर येथे रविवारी २२ फेब्रुवारी रोजी
सन १९६० पासून पंजीकृत असलेली महात्मा फुले शिक्षण संस्था रेशिमबाग, नागपूर शैक्षणिक कार्या सोबतच सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेली एकमेव संस्था आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या राज्यामधून संस्थेचे एकूण १३६०७ आजिवन सभासद आहेत. संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र, सावित्रीबाई फुले आय.टी.आय., महात्मा फुले अभ्यासिका, ग्रंथालय, सावित्रीबाई फुले महिला कर्मचारी वसतीगृह, महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, संस्थेद्वारा चालत आहेत. या शिवाय समाज जागरण मासिक, शिक्षकांचे प्रशिक्षण मेळावे, प्रख्यात डॉक्टरांचे मेळावे व उपचार शिबीर, रक्तदान शिबीर, साहित्य सम्मेलन तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व जेष्ठ नागरिकांचा सत्कार व पुरस्कार व महिला प्रबोधन कार्य व इतर सामाजिक कार्यक्रम महात्मा फुले शिक्षण संस्था दरवर्षी घेत असते. सतत ३२ वर्षापासून माळी समाजाजील अंदाजे २००० उपवर युवक-युवतीचा मेळावा २५ डिसेंबर या नियत तारखेला संस्था घेत असते. त्या दिवशी ‘योगायोग’ परिचय पुस्तिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न होत असतो. तसेच यापूर्वी पुर्नविवाह मेळाव्याचे दोन मेळावे संस्थेने यशस्वीरित्या पार पाडले. २०२६ या नव्या वर्षात महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांना प्रेरीत राज्यस्तरीय सर्व जातीय धर्मीय पूर्नविवाहास ईच्छूक विधवा-विधूर, घटस्फोटीत तसेच प्रौढ व्यक्तींचा परिचय मेळावा रविवार दिनांक २२.०२. २०२६ ला सकाळी ११ वाजता. संस्थेच्या सभागृहात होत आहेत. नोंदणी फार्म १२ फेब्रुवारी २०२६ संस्थेच्या Email ID – mahatmafuless@gmail-com वर किंवा ऑफिस मध्ये येऊन कलर पासपोर्ट फोटो सह भरावे. संस्थेचे अध्यक्ष प्रा.अरुण पवार यांनीप्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.








