spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मांगली (तेली) येथे दोन दिवसीय मंडईची सुरुवात आजपासून जंगी कुस्त्यांच्या आमदंगलीने 

किशोर साहू, मौदा,ता१० :- मागच्या 57 व्या वर्षाप्रमाणे यंदा 58 व्या वर्षी सुद्धा माजी जि प उपाध्यक्ष स्वर्गीय ज्ञानेश्वर साठवणे यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या मांगली (तेली) येथे दोन दिवसीय मंडईची सुरुवात उद्या शनिवार (दि. 10 जानेवारी) ला दुपारी 2 वाजता जंगी कुस्त्यांच्या आमदंगलने होणार आहे. रात्री 7 वाजता पासून जय बजरंग नाट्य रंगभूमी देसाईगंज (वडसा), युवा रंगमंच, लेखक युवराज प्रधान प्रस्तुत घास एक मोहमाया या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 11 जानेवारीला सकाळी 10 वाजता पासून राष्ट्रीय आझाद कलापथक ,निळा निशान संगीतमय खडीगंमत शाहीर निल आझाद उमेशकुमार व सहकारी वसंत यांच्या जाहीर तमाशा. रात्री 8 वाजता लावणी डान्स ग्रुप यांच्या छत्तीस नखरेवाली लावणीचा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री सुनील केदार ,खासदार श्यामकुमार बर्वे, कार्यक्रमाचे उद्घाटक महसूल मंत्री तथा पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, प्रमुख अतिथी माजी आमदार टेकचंद सावरकर ,मौदा नगरपंचायत नगराध्यक्ष प्रसन्ना (राजा) तिडके, प्रमुख अतिथी आमदार अभिजीत वंजारी, माजी मंत्री राजेंद्र मुळक ,आमदार कृपाल तुमाने माजी जि प पदाधिकारी सुरेश भोयर, तापेश्वर वैद्य, देवेंद्र गोडबोले, अवंतिका लेकुरवाडे, भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल,माजी सभापती स्वप्निल श्रावणकर,सरपंचा निशा रविंद्र फटिंग, उपसरपंच मोनू कवडू साठवणे सह गावातील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून या आमदंगल व मंडई उत्सवाच्या लाभ घेण्याचे आव्हान आखाडा कमिटी अध्यक्ष नरेश फटिंग, उपाध्यक्ष धर्मेंद्र डोरले ,सचिव हिरालाल साठवणे समस्त सदस्य गण , पहेलवान कमिटी व गावकरी मंडळींनी केले आहे.

Popular Articles