spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सिनर्जी फिटनेसला ‘Best Gym Chain in India 2026’ पुरस्कार

– नागपूरचे अजिंक्य वखरे पुरस्काराने सन्मानित

नागपूर :- भारतातील फिटनेस क्षेत्रात आपली भक्कम ओळख निर्माण करणाऱ्या सिनर्जी फिटनेस या जिम चेनला ‘Best Gym Chain in India 2026’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान आंतरराष्ट्रीय फिटनेस ब्रँड BodyPower आणि Star Classic India यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला. हा पुरस्कार चेअरमन अजिंक्य वखरे यांना BodyPower चे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी Nick Orton आणि Star Classic India चे Abhijeet Gawande यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा भव्य पुरस्कार सोहळा देश-विदेशातील फिटनेस तज्ज्ञ, उद्योगनेते आणि नामांकित ब्रँड्सच्या उपस्थितीत पार पडला.

सिनर्जी फिटनेस ने आधुनिक प्रशिक्षण पद्धती, उच्च दर्जाची उपकरणे, प्रशिक्षित ट्रेनर्स आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांमुळे अल्पावधीतच भारतातील एक विश्वासार्ह आणि वेगाने वाढणारी जिम चेन म्हणून नाव कमावले आहे. विशेषतः नागपूरमधून सुरू झालेला हा ब्रँड आज राष्ट्रीय स्तरावर फिटनेस क्षेत्रात एक आदर्श मानला जातो.या सन्मानाबद्दल बोलताना अजिंक्य वखरे म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा, शिस्तीचा आणि फिटनेसप्रती असलेल्या समर्पणाचा सन्मान आहे. Body Power आणि Star Classic India सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून मिळालेली ही मान्यता आम्हाला आणखी उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा देईल. हा पुरस्कार केवळ Synergy Fitness साठीच नव्हे, तर भारतीय फिटनेस इंडस्ट्रीसाठीही अभिमानास्पद क्षण असल्याचे मानले जात आहे.

Popular Articles