– ०६ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त
देवलापार :- देवलापार पोलीस पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा वरघाट नाला येथे अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस वरघाट नाल्याकडे जात असतांना संशयित ट्रॅक्टर क. एम एच ४०/सि एक्स ३९६१ व विनाक्रमांकाची ट्रॉलीसह मिळून आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली. वाहन चालक १) रोशन मनोज कोरचे, वय २२ वर्ष, रा. रोंघा, ता. तुमसर, जि. भंडारा हा मिळुन आला. आरोपीस रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत माहीती प्राप्त झाली. मालकाबाबत विचारपुस केली असता मालक नामे संजय उर्फ भोज्या लेकचंद बावीसताले, रा. वरघाट, ता. रामटेक याचे सांगणेवरून रेतीचे उत्खनन करूप् चोरटी वाहतूक करीत असल्याचे सांगतिले.
पोलीसांनी पंचासमक्ष ट्रॅक्टर क. एम एच ४०/सि एक्स ३९६१ किंमती ५,००,०००/- रूपये आणि विनाक्रमांकाची ट्रॉली किंमती १,५०,०००/- रूपये, ०१ ब्रास रेती किंमती ५,०००/- रूपये असा एकुण किंमती ६,५५,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. नमुद आरोपी यांच्या विरूध्द पोलीस स्टेशन देवलापार येथे कलम ३०३(२), ४९ भा. न्या.सं २०२३, ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल संहीता १९६६, सहकलम ४, २१ खानी आणि नियमन अधिनियम १९५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







