– मंत्री बावनकुळे यांचे एसडीओ ला भ्रमणध्वनी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश
किशोर साहू, मौदा :- चाचेर – निमखेडा सर्कल मधील निमखेडा येथील अनेक वर्षापासून राहणाऱ्या आदीवासी नगर ,प्रेमनगर मधील लोकांना पट्टे मिळावे म्हणून अनेक दिवसाची मागणी होती.
याबाबत भाजपा चाचेर मंडळ अध्यक्ष रवींद्र चव्हाण व खंडाळा (गांगनेर) सरपंच, गांगनेर उपकेंद्र आरोग्य समिती सभापती तथा भाजपा किसान आघाडी जिल्हा महामंत्री संकेत झाडे यांचा नेतृत्वात रविवार (ता. 10 एप्रिल) ला या महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्वान महसूल मंत्री व गोर गरीब जनतेला न्याय देणारे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कोराडी येथे भेट घेऊन या निमखेडा गावातील गोर गरीब जनतेचा समस्या मंत्री महोदय यांचा लक्ष्यात आणून दिल्या आणि त्यांना निवेदन देण्यात आले.
मंत्री बावनकुळे यांनी निवेदन घेऊन तात्काळ एसडीओ ला पत्र रिमार्क करून आणि एसडीओला भ्रमणध्वनी वरून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले .
यावेळी भाजपा चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण,सरपंच संकेत झाडे, उमेश शेंडे, मनराज पंधरे, विनोद बिसेन, विक्की संयाम , नरेश बेलेकर, मेघा पाटील, भरतलाल नेवारे, रमेश खारकर, बिहारी पटले, प्रेम मेश्राम, पुरणलाल मस्के, निर्मला बावणे, चंद्रकला सोनवणे, सुगरता राऊत, कांता नेवारे, सुलोचना राउत, देवका सोनावणे,सुरेश धारणे, विजय गोध्ये सह शेकडो पुरुष महिला मंडळी उपस्थित होते.