– 1500 हून अधिक रोपांचे दान, पर्यावरण संवर्धनाला चालना
नागपूर :- पर्यावरण संवर्धनासाठी एक उल्लेखनीय संयुक्त उपक्रम म्हणून यंत्र इंडिया लिमिटेड (माजी ऑर्डनन्स फॅक्टरी) परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्या यांनी 1500 हून अधिक रोपांचे दान यंत्र इंडिया लिमिटेडला केले असून, त्यांचे रोपण व संगोपन यंत्र इंडिया लिमिटेडतर्फे करण्यात येत आहे. हा वृक्षारोपण कार्यक्रम यंत्र इंडिया लिमिटेडच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नीम, जांभूळ, पिंपळ, वड यांसारख्या पर्यावरणपूरक वृक्षांचा समावेश करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्याने रोपांचे दान करून या हरित मोहिमेस मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमात यंत्र इंडिया लिमिटेडचे CMD आय.आर.अय्यर हे त्यांच्या पत्नी प्रिया अय्यर यांच्यासह उपस्थित होते. यावेळी आर्या व रश्मी आर्या, गर्ग, सीमा गुप्ता तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन (MOC) अर्चना सिंग यांनी केले.
पर्यावरण संवर्धनातील योगदानाबद्दल यंत्र इंडिया लिमिटेडतर्फे रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्याच्या अध्यक्ष रोटेरियन डॉ. मनीषा राठी, मानद सचिव रोटेरियन विनम्र खेमुका, तसेच पर्यावरण समिती अध्यक्ष रोटेरियन डॉ. स्वर गट्टानी यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. रोटरी क्लबच्या वतीने रोटेरियन देशमुख, रोटेरियन जगदीश चतुर्वेदी, अपुर्वा हेडा, अमृता गट्टानी, रोटेरियन प्रविण गोटमारे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. CMD श्री अय्यर यांनी रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्याच्या सहकार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा संयुक्त सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमांत सहभाग कायम राहील असे नमूद केले.








