spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

साकोली पोलिसांची अवैध हातभट्टीवर धाड; १.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज, भंडारा साकोली :- साकोली पोलिसांनी जांभळी सडक परिसरातील मकरघोकडा रिटी झुमरी नाल्याजवळ सुरू असलेल्या अवैध हातभट्टीवर छापा टाकून १ लाख १४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी आरोपी रितेश रमेश गेडाम (वय ३८, रा. जांभळी सडक) याच्या ताब्यातून १००० किलो सडवा मोहाफूल, ३० लिटर तयार हातभट्टी दारू, लोखंडी ड्रम, जळाऊ लाकूड आणि दारू गाळण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (फ), (ब), (क), (ङ), (ई) अन्वये गुन्हा (अ.क्र. ५१९/२०२६) नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि पोलीस निरीक्षक आचरेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बेडवाल, पो.हवा. मते व पथकाने केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.