– आठ विद्यार्थीनी गाईड तर तिन विद्यार्थी स्काऊट परीक्षेत उत्तीर्ण
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् मुंबईतर्फे गाईड आणि स्काऊटच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यपुरस्कार परीक्षेत शहरातील समर्थ हायस्कूलच्या इयत्ता ९ वीच्या ८ विद्यार्थिनी गाईड आणि तीन विद्यार्थ्यांनी (मुले) स्काऊट परीक्षेत भरभरीत यश मिळवले. त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा येथे राज्य स्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरा (स्काऊट विभाग) चे आयोजन करण्यात आले होते. ५ ते ८ जानेवारी दरम्यान मुलींसाठी (गाईडची) व ८ ते ११ जानेवारी दरम्यान मुलांसाठी (स्काऊट) घेण्यात आली. समर्थ हायस्कूलच्या इयत्ता ९ व्या वर्गातील लिना गुलाब चाफले, त्रिशा उमाकांत शरणागत, आस्था दिनेश बिसेन, आठ विद्यार्थिनी गाईड आणि तीन विद्यार्थी स्काऊट परीक्षेत उत्तीर्ण सुहाना बंडू टोपले, तनिष्का लाला रोडे, अक्षदा मोरेश्वर सोमनाथे, भूमिका तुळशिराम पिसोडे, श्रेयशी विलास मेश्राम या आठ मुली गाईड परीक्षेत आणि अभंग रुषीकेश किंमतकर, ईशांत दयाराम हटवार, यथार्थ पांडूरंग सरोदे हे तीन विद्यार्थी स्काऊट परीक्षेत भरभरीत यश संपादन करत उत्तीर्ण झाले. स्काऊट शिक्षक प्रफुल वांढरे यांनी परीक्षेसाठी तयार केले होते. मुख्याध्यापिका लोखंडे मॅडम, उपमुख्याध्यापक गायकवाड, पर्यवेक्षिका फंदे मॅडम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




