spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सम्राट अशोक विद्यालयात लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

– प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन; विद्यार्थ्यांना सामाजिक व लोकहितवादी कार्याचा आदर्श जोपासण्याचा संदेश

पंकज परशुरामकर, इनसाइडर न्युज टुडे  

नवेगावबांध :- नजीकच्या उमरी येथील सम्राट अशोक विद्यालयात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. टेंभुर्णे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात अजितदादा पवार यांच्या प्रशासनातील कार्यशैली, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि जनहितासाठी केलेल्या योगदानाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी समाजहिताची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे कार्य करण्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी एस. व्ही. बडोले, एच. एस. पात्रीकर, लता टेंभुर्णीकर, कुणाल बडोले तसेच ठाणेराव वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा स्मरणपूर्वक गौरव केला. विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी बापू पंलचवार व गौरव चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा प्रेरणादायी उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नवेगाव बांध जवळील उमरी येथील सम्राट अशोक विद्यालयात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करताना मुख्याध्यापक टेंभुर्णे यांच्यासह,शिक्षक व विद्यार्थी.

Popular Articles