spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रेती तस्कर शुभम रडके एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

भिवापूर :- भिवापूर अंतर्गत आरोपी नामे शुभम गुणवंत रडके, वय २४ वर्ष, रा. मसाळा, दत्त मंदीर जवळ, मसाळा कामठी रोड, ता. कामठी जि. नागपूर याचेवर नागपुर ग्रामीण जिल्हयात अवैधरित्या विनापरवाना रेती चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहे. नमुद आरोपी असे गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. असे गुन्हे करून तो शासनाचा महसुल बुडवुन शासनाचे आर्थिक नुकसान करतो. तसेच पर्यावरणाला सुद्धा नुकसान पोहचवतो. नागपुर ग्रामीण पोलीसांनी वेळोवेळी कारवाई करून त्याचेवर गुन्हे नोंद करून त्याला अटक केले. तसेच त्याचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. तरीसुध्दा शुभम गुणवंत रडके याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली.

हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात भिवापूर पोलीसांकडुन एम.पी. डी.ए कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली. दिनांक ०२/०३/२०२६ रोजी जिल्हाधिकारी, नागपुर यांनी नमुद आरोपीला १ वर्षा करीता स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले आहे.

Popular Articles