कन्हान :- पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत राहणारा सराईत आरोपी मनोज चैतराम चिमणकर, वार्ड कं ६ संताजी नगर कांद्री कन्हान याचेवर स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम अन्वये १ गुन्हा तसेच अवैध जुगाराचे ५ गुन्हे नोंद असुन सदर आरोपी हा गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. नागपुर ग्रामीण पोलीसांनी त्याचे विरूध्द कारवाई करून गुन्हे नोंद केले तसेच आरोपीचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता वेळोवेळी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु आरोपी मनोज चिमणकर याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली. आरोपीचे कृत्य समाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने कन्हान पोलीसांकडुन एम.पी.डी.ए. कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली. दि. ०९/१०/ २०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी नागपुर यांनी सराईत गुन्हेगार मनोज चैतराम चिमणकर याचे विरूध्द एक वर्षा करिता मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे स्थानबध्द तेता आदेश काढला असता कन्हान पोलीसांनी तात्का ळ आरोपीचा शोध घेवुन दिनांक ०९/१०/२०२५ रोजी त्याला मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे दाखल केले आहे .








