कन्हान :- दुर्गा मंदीर देवस्थान कमेटी कांद्री-कन्हान व्दारे भगवान बुवा मंदिर, दुर्गा मंदिर देवस्थान येथिल शनिदेव मुर्तीची पुजा अर्चना करून महाप्रसाद वितरण करून शनिदेव जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.
शनिवार (दि.१६) मे २०२६ ला भगवान बुवा मंदिर, दुर्गा मंदिर देवस्थान येथिल शनिदेव मुर्तीची सकाळी पासुन रात्री पर्यंत बाहेर गावाहुन आलेल्या भाविकांना पूजा तेल अभिषेक विधीवत शनि भगवान देवाची पुजा करून प्रार्थना केली. त्याच प्रमाणे दुर्गा मंदिर देवस्थान कमेटी सदस्य कांद्री यांचे मार्फत सुध्दा मंदिर पंडित अरविंद पांडे यांचे प्रमुख उपस्थितीत विधीवत पूजा, तेल अभिषेक, होम यज्ञ उपस्थित भक्त मंडळी यांचे हस्ते करण्यात आले आणि आरती करून प्रसाद तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आला. कांद्री येथिल दुर्गा मंदीरात शनिदेव जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.