– उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाला विधान परिषद उमेदवारी द्यावी
– विदर्भ धनगर परिषदेच्या बैठकीत समाजबांधवांची आग्रही मागणी
अमरावती :- विधान परिषदेची 12 मे रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील धनगर समाजाला उमेदवारी द्यावी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एडतकरांना दिलेले वचन पाळावे, अशी मागणी विदर्भ धनगर परिषदेच्या बैठकीतून धनगर समाजाने केली आहे.
यासंदर्भात धनगर समाजाची विदर्भस्तरीय बैठक माजी आमदार हरि भदे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या बैठकीत राजकीय मंथन करण्यात आले. 1990 मध्ये शिवसेना आमदार व जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे वाशीम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविलेल्या लक्ष्मणराव एडतकर यांना विधान परिषदेत पाठवून धनगर समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात येईल, असे घोषीत केले होते. बाळासाहेबांनी केलेल्या त्या घोषणेची दुर्देवाने तेव्हा अंमलबजावणी होऊ शकली नाही. परंतु आता बाळासाहेब ठाकरे यांचे ते वचन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, दिलीप लक्ष्मणराव एडतकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन पूर्ण करावे, अशी विनंती उपरोक्त बैठकद्वारे धनगर समाज बांधवांनी केली. ![]()
धनगर समाजावर सर्वपक्षीय अन्याय
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आजपावेतो कोणत्याही पक्षाने विदर्भात धनगर समाजाला एखादा अपवाद वगळता कुणालाही विधान परिषदेत पाठविलेले नाही. सर्वच पक्षांनी धनगर समाजाची प्रतारणा केली असून धनगर समाजाचा फक्त वापर केलेला आहे, हे सर्वश्रृत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीप एडतकर यांच्या माध्यमातून धनगर समाजाला न्याय द्यावा व बाळासाहेबांनी दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन विदर्भ धनगर परिषदेतर्फे करण्यात आल्याचे विदर्भ धनगर परिषद कार्याध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ भदे यांनी म्हटले आहे.
विदर्भ धनगर परिषदेच्या बैठकीला डॉ. प्रमोद पातुर्डे, काशीराम साबळे (अकोट), भास्करराव ढेवले, संतोष साव, रमेश पाटील (नागपूर), गणेशराव पावडे (नागपूर), अरुण बांबल, हरिदास भदे (अकोला), जनार्दन पातुर्डे, उत्तमराव गोंडसे (तिवसा), डॉ. रमेश महानुर (यवतमाळ), डॉ. मेघश्याम करडे, प्रमोद तालन, दिगांबर करडे, ओंकार उंदरे (धामणगावरेल्वे), प्रकाशराव वाढे, लक्ष्मण उघडे, भाऊराव गाढवे (धामणगावरेल्वे), शिवदास कोल्हे, मनोज कचरे, अनिल कोल्हे, प्रकाशराव बोबडे, रमेश पाटेकर, अनिल चेंडकाळे ,केशव चव्हाण (पुसद), भास्कर उघडे (दारव्हा), अशोकराव मस्के, संभाजी गावंडे, अशोक गावंडे (पुसद), दिनेश बांबल, भास्कर पुनसे, प्रवीण नवरंगे, प्रा. एल. डी. सरोदे (मुर्तिजापूर), डॉ. वैभव धुमाळे, अजय साव, बाळासाहेब काळमेघ (नागपूर), सुरेश चारबैल, प्रा. राजाभाऊ काळमेघ (वरुड), प्रदीप कोल्हे, प्रवीण भागवत, राजेंद्र म्हस्के, प्रफूल्ल औघड, सदाशिव गाढेकर, दिलीप घुरडे (तिवसा), कृष्णराव बांबल (करजगाव), माधव अवघड, सुधीर गोंडसे, छाया कात्रे, जयश्री शहाकार, नंदा चाफले, ज्ञानेश्वर ढोमणे, राजू गंधे, अशोकराव इसळ, वामनराव सरोदे, महादेवराव रोकडे, पंकज गोहत्रे, अॅड. अचल कोल्हे, घनश्याम बोबडे, प्रमोद कापडे, रमेश ढवळे, राजू डांगे, प्रा. संजय लव्हाळे, सदानंद नागे, शिवहरी बोकडे, साहेबराव भदे, ब्रम्हदेव काळे, डॉ. संदीप सुशीर, प्रकाश सरोदे, बबनराव काळे डॉक्टर सुधाकर काळमेघ ॲड. अचल कोल्हे आदी उपरोक्त बैठकीला उपस्थित होते.![]()
12 मे रोजी विधान परिषदेच्या निवणुका होऊ घातलेल्या आहेत. त्या निवडणुकीमध्ये दिलीपराव एडतकर यांना उमेदवारी द्यावी, अशी विदर्भ धनगर समितीची विनंती आहे. 1990 मध्ये कै. लक्ष्मणराव एडतकर यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विधान परिषदेत पाठविण्याचा शब्द दिला होता. तो शब्द शिवसेनेकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाळावा, अशी त्यांना विनंती आहे.
– हरिभाऊ भदे, माजी आमदार, अकोला
महाविकास आघाडीने विदर्भाला प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे. काँग्रेसचा उमेदवार म्हणून महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आणि प्रभारी तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेतेमंडळीकडे विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेला आहे. त्यावर त्यांनी विचार करावा, एकच जागा असल्यामुळे ती शिवसेनेकडे आहे, असे कळते. पण त्या जागेवर उद्धव ठाकरे उभे राहणार नसतील तर ती जागा काँग्रेसकडे जाईल आणि काँग्रेसने ती जागा धनगर समाजाला, विदर्भाला द्यावी, अशी मागणी आहे.
अॅड. दिलीप एडतकर, माजी प्रदेश सरचिटणीस काँग्रेस
उद्धव ठाकरे यांच्यासाठी ती जागा सुटली नाही तर महाविकास आघाडीची ती एक जागा काँग्रेसकडे नक्कीच जाईल. दिलीपराव एडतकर यांचे काँग्रेसमध्ये जे कार्य आहे, त्यानुसार विदर्भातून अॅड. दिलीप एडतकर यांना ती जागा मिळावी, ही संपूर्ण विदर्भातील धनगर समाजबांधवांची मागणी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द उद्धव ठाकरे पाळणार नसतील तर शिवसेना जिल्हा समन्वयक म्हणून बाळासाहेबांचा शब्द पाळणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्याकडे हा प्रस्ताव नक्कीच मांडणार.
– अरुण पडोळे, जिल्हा समन्वयक, शिवसेना (शिंदे)