भरदिवसा चोरीची धक्कादायक घटना कुटुंब घरात असतानाच लॅपटॉप व मोबाईल लंपास

0
49

 

नागपूर २१ : नागपूर शहरात चोरट्यांच्या वाढत्या दहशतीचे आणखी एक उदाहरण बुध नगर परिसरात समोर आले आहे. पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक घटनेत, चोरट्याने कुटुंबीय घरात असतानाच घरात शिरून लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन लंपास केले.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉ. श्याम शेंडे हे बुध नगर येथे कुटुंबासह राहतात. बुधवारी सकाळी, शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य घराच्या वरच्या मजल्यावर होते. याच संधीचा फायदा घेत एका अज्ञात चोराने खालच्या मजल्यावर प्रवेश केला.

चोरट्याने खोलीत ठेवलेला लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना शेजारच्या घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.

फुटेजमध्ये आरोपीच्या हालचाली स्पष्टपणे दिसत असून, त्याच्या ओळखीबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेनंतर डॉ. शेंडे यांनी तातडीने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.

@filephoto