नागपूर :- राज्याच्या एसआयआर प्रक्रियेत सोपवण्यात आलेल्या जबाबदारीत हलगर्जीपणा करणाऱ्या ११ ‘बीएलओ’ना मनपा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनपाच्या धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम यांनी बीएलओ यांना कारणे दाखवा नोटीस बजाविले आहे.
यात बीएलओ वैशाली मसराम, निता गुप्ता, जुव्हेना भिसे, रंजीता काळे, लक्ष्मी गोलू, संगीता अँटोनी, पिंकी परतेती, सुनिता वासनिक आणि रामेश्वर आत्राम अशा एकूण ११ जणांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने आपले स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगविषयक कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



