साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे दहीहंडी व गोपाल काल्याने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

0
179
Oplus_131072
 
कन्हान २१ : – साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे पंचमी निमित्य शालेय विद्यार्थ्यानी वेगवेगळे वर्गाच्या चंमुनी  दहीहंडी फोडुन सर्व उपस्थित सर्वाना गोपाल काल्या चा प्रसाद वितरण करून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
           बुधवार (दि.२०) ऑगस्ट ला साईबाबा आश्रम शाळा टेकाडी येथे पंचमी निमित्य मुख्याध्यापक मा. संजय काळे यांच्या अध्यक्षेत श्रीकृष्णा च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दहीहंडी कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी आश्रमशाळेतील वर्गवार विद्यार्थ्याच्या चंमुचे गट तयार करून पाळी पाळीने संगित व गाण्याच्या तालावर दहीहंडी फोडण्याचा पर्यंत केला. चांगल्याच वेळाने एका गटाला दहीहंडी फोडण्यास यश आले. त्यानंतर गोपाल काल्याचा प्रसाद सर्वाना वितरण करून ” जयश्री क्रिष्ण, कृष्ण भगवान की जय ” च्या जय घोषात कार्यक्रमाची सांगता करून श्रीकृष्ण पंचमी ला श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा करण्यात आला. दहीहंडी उत्सावाला माध्य. मुख्याध्यापक मा.संजय काळे सर, प्राथ. मुख्याध्यापक मा. बालपांडे सर, निखाडे सर, डोंगरे सर, सातपुते सर, चौधरी सर, यावले सर, खिड्डेकार सर, सरोदे सर, मसराम मॅडम, नरूले मँडम सह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आंनद घेतला.