spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लोक जनशक्ती पार्टीच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत नागदेवे यांची निवड !

– केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या आदेशाने विदर्भ अध्यक्ष सतीश लोणारे यांनी केली घोषणा; कलावंत ते राजकीय नेतृत्व, जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

हंसराज,भंडारा :- लोक जनशक्ती पार्टीच्या (पासवान) भंडारा जिल्हाध्यक्षपदी ख्यातनाम लोककलावंत व सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत नागदेवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या आदेशान्वये, पक्षाचे विदर्भ अध्यक्ष सतीश लोणारे यांनी ही अधिकृत घोषणा केली.

भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात २० सप्टेंबर रोजी पक्षाचा भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा पार पडला. या वेळी विदर्भ अध्यक्ष सतीश लोणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीकांत नागदेवे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आणि त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

श्रीकांत नागदेवे हे खळ्या-गमतीचे (खडी गम्मत) लोकप्रिय कलावंत असून, आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी खेडोपाडी सातत्याने समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. तसेच सर्वसामान्य, वंचित घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरून न्याय-हक्काची लढाई लढणारे लढाऊ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या याच सामाजिक व सांस्कृतिक कार्याची विशेष दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जिल्हा नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

आपल्या निवडीनंतर बोलताना श्रीकांत नागदेवे म्हणाले की, “पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कलावंत व कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून ही मोठी जबाबदारी दिली आहे. या निवडीचे संपूर्ण श्रेय मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना देतो. आगामी काळात जिल्ह्यात पक्षाचे संघटन तळागाळापर्यंत मजबूत करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन.”

श्रीकांत नागदेवे यांच्या निवडीमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते मनोज खोब्रागडे, रवी बाबू भवसागर, लोकशाहीर अंबादास नागदेवे, प्रकाश नागतोडे, मुस्ताक खान पठाण, हनीफ शेख, संजय नागदेवे, राजेंद्र लांजेवार, युगंधर बारसागडे, गंगाधर धोत्रे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व कार्यकर्त्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.