spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेच्या नागरिकाला मतदार निवडून देत नसल्याने सर्वच पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांचा समावेश

किशोर साहू, मौदा :- वाकेश्वर येथे किनेकर यांच्या पान टपरीवर रोज सकाळी चाय पे चर्चा होत असते.आज रविवार (ता. 24 मे) ला चर्चेदरम्यान सामाजिक कार्यकर्ते नंदू पुडके यांनी अत्यंत महत्त्वाची चर्चा करताना सांगितले की, मतदार प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेच्या नागरिकाला निवडून देत नसल्याने सर्वच पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांच्या समावेश झालेला आहे. त्यामुळे आज राजकारणात प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेचे नागरिक निवडणूक लढण्यास इच्छुक नसतात.

येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेच्या नागरिकाच्या नावासमोरील बटन दाबून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकाला राजकारणात येण्यापासून थांबू शकता येते. तरीसुद्धा सुज्ञ नागरिकांनी येणाऱ्या आगामी निवडणुकीला कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेच्या नागरिकाला निवडून देण्याचे आव्हान वाकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू पूडके यांनी चाय पे चर्चा दरम्यान केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.