spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर शहरात विविध परिसरातून सहा जण बेपत्ता

 

नागपूर १३ – शहरातील विविध भागातून सहा जण बेपत्ता झाल्याची प्रकरणे पोलीस ठाण्यांत नोंद झाली आहेत. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ते कुठेही सापडले नाहीत. पोलीसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

कळमणा पोलीस ठाणे हद्दीतून बेपत्ता
संतोष भन्ना लहरे (वय ६०), रा. चिखली जलवस्ती, कळमणा, हे २० जुलै रोजी दुपारी १२ वाजता घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेले. ते आजतागायत परत आलेले नाहीत. त्यांचा रंग सावळा, चेहरा गोल, बांधा मध्यम, उंची ५ फूट ५ इंच असून, अंगात पांढऱ्या रंगाची बनियान व निळ्या रंगाची हाफ पॅन्ट होती. ते मराठी व हिंदी बोलतात व गतीमंद आहेत.

नंदनवन पोलीस ठाण्यात तीन प्रकरणे
विजय लोकूराम पौनिकर (वय ३६), रा. विनकर कॉलनी, अजनी, हे ८ ऑक्टोबर २०२४ रोजी वाठोडा रिंग रोडवरील लक्ष्मी ढाबा येथून निघून गेले व परतले नाहीत. त्यांचा रंग सावळट, चेहरा गोल, बांधा मजबूत, उंची ५ फूट ७ इंच असून, अंगात शर्ट व पॅन्ट होती.

दिलीप रामनयन चौधरी (वय २४), रा. हसनबाग, हे ८ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता घरातून बाहेर पडले. रंग निमगोरा, चेहरा लांबट, बांधा सडपातळ, उंची ५ फूट ५ इंच, अंगात काळा शर्ट व निळी जिन्स, सोबत दुचाकी होती.

कार्तिक उर्फ निखील नरेश वानखेडे (वय २५), रा. श्रीकृष्ण नगर, नंदनवन, हे २९ जुलै रोजी उज्जैनला जातो असे सांगून निघून गेले. रंग सावळा, चेहरा गोल, बांधा मजबूत, उंची ५ फूट ४ इंच, अंगात कत्थई रंगाचा टी-शर्ट व निळी जिन्स होती.

तहसील पोलीस ठाण्यातून बेपत्ता
मोहम्मद उमेर मोहम्मद आशिफ (वय २२), रा. अमरावती, सध्या मोमीनपुरा, हे ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ८ वाजता मोठा ताजबाग येथे जातो असे सांगून घरातून निघाले. रंग सावळा, चेहरा लांबट, बांधा मध्यम, उंची ५ फूट ७ इंच, दाढी लांब, अंगात पांढरा फुल शर्ट व सिमेंट रंगाची पॅन्ट होती. ते उर्दू, मराठी व हिंदी बोलतात.

कपिलनगर पोलीस ठाण्यातून बेपत्ता महिला
पल्लवी उर्फ सत्यशिला मानसिंग कोडवते (वय २२), रा. वझीटोला, गोंदिया, सध्या खसाळा, कपिलनगर, या ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घरातून निघून गेल्या. रंग गोरा, चेहरा गोल, बांधा सडपातळ, उंची ५ फूट ३ इंच, अंगात निळी कुर्ती व पांढरी लॅगिन होती.

पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वरील व्यक्तींपैकी कोणीही दिसल्यास संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Popular Articles