spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

DRDO गेस्ट हाऊसचा व्यवस्थापक ISI साठी हेरगिरी करताना अटक

 

जयपूर १३ – पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी केल्याच्या गंभीर आरोपाखाली राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागाने मंगळवारी महेंद्र सिंह (रा. अल्मोरा, उत्तराखंड) याला अटक केली. महेंद्र सिंह हा जैसलमेरमधील चांदन फील्ड फायरिंग रेंजजवळील DRDO गेस्ट हाऊसचा व्यवस्थापक असून, तो पाकिस्तानला देशाच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत संवेदनशील माहिती पुरवत असल्याचे उघड झाले आहे.

गुप्तचर विभागाने आठवडाभरापूर्वी संशयावरून त्याला ताब्यात घेऊन जयपूर येथे विविध सुरक्षा यंत्रणांसह संयुक्त चौकशी केली. चौकशीत सबळ पुरावे मिळाल्याने त्याच्यावर ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, 1923 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आयजी विष्णूकांत यांच्या मते, आरोपीने आपल्या पाकिस्तानी हँडलरला नियमितपणे डीआरडीओचे शास्त्रज्ञ आणि भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या चांदन फील्ड फायरिंग रेंजवरील भेटींची माहिती दिली. तसेच, क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रास्त्रांच्या चाचण्यांबाबतची गोपनीय माहितीही पाकिस्तानला पुरवली. गेल्या ४-५ वर्षांपासून गेस्ट हाऊसचे व्यवस्थापन सांभाळत असताना त्याने सामरिक लष्करी मोहिमांशी संबंधित महत्त्वपूर्ण डेटाही लीक केल्याचा संशय आहे.

Popular Articles