spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शेतमजूर व ग्रामीण कामगारांचे नारे,निदर्शने

– तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन 

बेला :- अब्जाधीशांच्या तावडीतून सत्ता जावी, गणेश कुमार यांचा राजीनामा, एस आर प्रक्रिया रद्द, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा, वास्तव्यासाठी जमिनीचा पट्टा नावे करा वन हक्के दावे मंजूर करा दुष्काळग्रस्त भागातील शेतमजुरांना तीस हजार रुपयाची आर्थिक मदत 60 वर्षावरील नागरिकांना पाच हजार रुपये दरमहा पेन्शन लागू करा. बेला व इतर नद्यांमध्ये होणारा दूषित पाणीपुरवठा बंद करा आधी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर व इतर ग्रामीण कामगार युनियन लालबावटाच्या वतीने बेला येथे अप्पर तहसील कार्यालया समोर नारे निदर्शने करीत घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित मागण्यांचे निवेदन अप्पर तहसील कार्यालयात देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तुळशीराम तेलघरे, माकप चे जिल्हा सचिव अरुण लाटकर, मनोहर मुळे,बेला युनिट अध्यक्ष देविदास तराळे, लीलाधर शिंदेकर, विनोद दालवणकर, गणपत वराडे व अनेक शेतमजूर नागरिक उपस्थित होते. जिल्हा सचिव अरुण लाटकर यांनी नारे निदर्शने करणाऱ्या उपस्थित शेतमजुरांना मौलिक मार्गदर्शन केले. घोषणाबाजी प्रसंगी १४० शेतमजूर नागरिक उपस्थित होते.

Popular Articles