spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एमएसबीटीईकडून श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठीला सलग ‘उत्कृष्ट (Excellent)’ संस्थेचा बहुमान

कामठी :- श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठीला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (एमएसबीटीई) यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ‘उत्कृष्ट (Excellent)’ संस्थेचा मानांकन बहाल केला आहे. विशेष म्हणजे, महाविद्यालयाला हा बहुमान सलग अनेक वर्षांपासून प्राप्त होत असून यंदाही ही परंपरा कायम राखण्यात संस्थेला यश आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह विदर्भातील गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षण संस्थांमध्ये श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठीने आपले वेगळे स्थान अधोरेखित केले आहे.

हे मानांकन संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता, प्रभावी अध्यापन पद्धती, अत्याधुनिक प्रयोगशाळा, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची मिळालेली गौरवपूर्ण दखल आहे.

या उल्लेखनीय यशाचे श्रेय संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रम, समर्पण व सांघिक कार्याला जाते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच संस्थेला गुणवत्ता आणि उत्कृष्टतेचा हा मान पुन्हा एकदा प्राप्त झाला आहे.

याप्रसंगी प्रा. मिलिंद उमेकर, प्राचार्य, श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी यांनी सरिता बावणकुळे, विभागप्रमुख (डिप्लोमा इन फार्मसी) तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या अथक परिश्रम व सहकार्याबद्दल कौतुक व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, संस्थेच्या व्यवस्थापनाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दिलेल्या पूर्ण स्वातंत्र्यामुळेच हा मानाचा बहुमान सातत्याने प्राप्त होत आहे. तसेच त्यांनी किशोरी भोयर, अध्यक्षा आणि सुरेश भोयर, सचिव,  सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था, कामठी यांचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण पाठबळाबद्दल विशेष आभार मानले.

यावेळी सुरेश भोयर, सचिव, श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था यांनी प्रा. मिलिंद उमेकर व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखून संस्थेला देशातील सर्वोत्तम फार्मसी महाविद्यालयांपैकी एक म्हणून ओळख मिळवून दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.

उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक, अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर देणारे श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी हे फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रथम पसंती ठरत आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी या गुणवत्तापूर्ण संस्थेत प्रवेश घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्यास भक्कम दिशा द्यावी, असे आवाहन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.