spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सामाजिक कार्यकर्त्याला मनपाचा चुकीच्या पत्त्यावर अहवाल बनवून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी

 
 
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार चुकीच्या पत्त्यावर नोटीस पाठवून प्रा.सचिन काळबांडे यांना मानसिक त्रास देत आहे असा आरोप
 
राजकीय दबाव टाकून मानसिक त्रास असा आरोप
नागपूर २७ :  प्रा. सचिन शंकरराव काळबांडे हे आपल्या स्वमालकीच्या नझूल प्लांट नं १०३ खसरा नं १४५ जूना बगडगंज रोड महाल नागपूर येथील प्लॉटवर मनपा‌द्वारे बांधकामाची परवानगी घेऊन नियमानुसार बांधकाम करित आहे. परंतु मनपा गांधी झोन, महाल क.६, नागपूर यांचे कार्यकारी अभियंता कोंटागळे, उप अभियंता राजेश तेलरांधे कनिष्ठ अभियंता यांनी सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांचे मंजुरीने ०१ ऑगष्ट २०२५ रोजी, मौजा नागपूर, रामबाग येथे मिलिंद बौद्ध विहारा जवळ ह्या पत्त्यावरील जागेवर जाऊन तपासणी करून अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस प्रा. सचिन शंकरराव काळबांडे यांचा नझूल प्लॉट नं. 103 खसरा नं. 145 जुना बगडगंज नागपूरच्या लोखंडी गेटवर लावला. आणि 12 ऑगष्ट 2025 रोजी, मनपा गांधीझोन कार्यालयात दिला. सदरहू नोटीस मध्ये पंधरा दिवसांत अनधिकृत निवासी बांधकाम 32.65 चौ. मीटर ला पाडण्यात येऊ नये. यांचा 15 दिवसात प्रत्यक्ष खुलासा भेटून देण्यास सांगितले. त्याप्रसंगी सहाय्यक आयुक्त गांधीझोन गणेश राठोड, राजेश तेलरांधे व कोंटागळे यांना प्रत्यक्ष भेटून सदरहू नोटीस वरील रामबाग मिलिंद बौद्ध विहाराजवळ प्रभाग 17 मध्ये माझे कोणतीही बांधकाम नाही, माझे घर नाही, असेल तर मला ते दाखवा असे सांगितले. आणि लेखी खुलासा उत्तर सादर केले. परंतु माझ्या लेखी खुलासा बद्दल कुठलीही दखल न घेता त्यांनी पुन्हा 8 ऑगष्ट रोजी बांधकाम बंद करण्याची व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम कलम (971) 3z2 {6} अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे दुसरे नोटीस दिले. संबंधित प्रकरणात मनपा अधिकाऱ्यांची चूक आहे आणि सर्व वरिष्ठ अधिकारी ज्यात मनपा आयुक्त, उपायुक्त, (सामान्य) पालकमंत्री खासदार यांना लेखी तक्रार दिली. परंतु पुढील कारवाई अध्यापही झालेली नाही. उलट संबंधित अधिकारी यांनी माझे प्रकरण 14 ऑगष्ट 2025 रोजी स्लम मनपा विभागात पंजीबद्ध करून मला कुठलीही संधी न देता प्रकरण आदेशित सुद्धा केले आहे आणि माझ्याविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे पत्र पाठविले असल्याची माहिती मला मिळाली. माझे कार्य मुलांना मोफत शिक्षण शिकविण्यासाठी आरटीई फाउंडेशनच्या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी शासनाविरुद्ध आवाज उचलतो, न्यायालयीन लढा लढतो, शाळांना आणि पालकांना न्याय मिळवून देतो म्हणून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचत असल्याचे कार्य सदर मनपा प्रशासन व संबंधित अधिकारी रचत आहे आणि माझे स्वमालकी चे बांधकाम चुकीच्या पत्त्यावरील नोटीसद्वारे पाडून माझ्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्यास राजकीय दबाव आणून माझे सामाजिक कार्य संपविण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे मला न्याय मिळण्यास मी सर्व संबंधिता विरोधात न्याय मागून मानहानीचा दावा ठोकणार आहे. असे पत्रकारांना काळबांडे यांनी सांगितले.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.