spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शहर ‘सी एन्ड डी’ कचरामुक्त करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिम

– ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बांधकाम साहित्य उचलण्याची कारवाई होणार

नागपूर :- नागपूर शहारातील सर्व चौक व मुख्य रस्त्यांच्या बाजूला पडून असलेला डेब्रिज व बांधकाम साहित्य (सी एन्ड डी वेस्ट) उचलण्यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे विशेष मोहिम येत्या ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात शहरातील सर्व विकास संस्थांना त्यांचे बांधकाम साहित्य उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित व्यक्ती किंवा विकास संस्थांनी चौकांमध्ये तसेच मुख्य रस्त्यालगत पडून असलेले डेब्रिज व बांधकाम साहित्य उचलण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील चौक व मुख्य रस्त्यांच्या बाजूला असलेला डेब्रिज उचलण्याच्या संदर्भात महानगरपालिकातर्फे निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्देशानुसार, घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील चौक व मुख्य रस्ते स्वच्छ करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात विविध विकास संस्थानमार्फत केल्या जाणाऱ्या कामामुळे अनेक चौक व मुख्य रस्त्याच्या बाजूला डेब्रिज व बांधकम साहित्य पडून आहे. हे सर्व साहित्य त्वरित उचलण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या दहाही झोनल कार्यालयातर्फे नासुप्र, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएसईबी, रेलवे व इतर शासकीय विभागांसह मनपाच्या कंत्राटदार यांना देण्याचे याव्या, असे निर्देश घनकचरा विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

ही विशेष मोहिम नागपूर शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. येत्या ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या पाहणीत डेब्रिज व बांधकाम साहित्य आढळून आल्यास महानगरपालिकेच्या झोनल कार्यालयातर्फे बांधकाम साहित्य उचलण्याची कारवाई करण्यात येईल. या कारवाईसाठी झोनल कार्यालयांनी जेसीबी, टिप्पर सारखी मशीनरी तयार ठेवावी, असे निर्देश या परिपत्रकाद्वारे सर्व झोनल कार्यालये व झोनल स्वच्छता अधिकाऱ्यांना दिले आहेत. असेही या परिपत्रकात म्हटले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.