spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जागतिक श्रवण दिन व महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात

यवतमाळ :- येथील साऊंड स्पीच अ‍ॅन्ड हियरिंग सेंटर तर्फे ८ मार्च रोजी जागतिक श्रवण दिन (३ मार्च) आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. नीता सुखदेवे आणि त्यांच्या टीमने केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. आशिष पाटील, पांडुरणा येथील सरपंच रत्नदीप पवार तसेच हेल्थ कोच व उद्योजिका रिना वानखेडे उपस्थित होते.

कार्यक्रमाला कॉक्लिअर इम्प्लांट केलेल्या तसेच हियरिंग एड वापरणाऱ्या मुलांचे पालक, मित्र-मैत्रिणी, सहकारी, शेजारी तसेच साऊंड स्पीच अ‍ॅन्ड हियरिंग सेंटरच्या टीमने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी श्रवण आरोग्याचे महत्त्व, लहान मुलांमध्ये वेळेवर तपासणीचे महत्त्व तसेच महिलांचे समाजातील योगदान याबाबत मार्गदर्शनपर विचार मांडले. काही पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगतीबद्दलचे प्रेरणादायी अनुभवही सर्वांसमोर मांडले.

कार्यक्रमात मुलांनी भाषणे, नृत्य, कविता, हस्तकला आदी विविध सादरीकरणांद्वारे आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पालक, सहभागी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.