निलज येथील साप्ताहिक बाजाराच्या शुभारंभाला दुकानदार व ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद

0
119

– शाल व त्रिफळ देऊन दुकानदारांच्या ग्रामपंचायत तर्फे सत्कार, उद्या बुधवारला दुसऱ्या साप्ताहिक बाजाराला पुन्हा दुकानदार व ग्राहकांची गर्दी वाढणार

किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील सीमेवरील पारशिवनी तालुक्यात अंतर्गत येत असलेल्या निलज येथे 18 मार्च बुधवारला साप्ताहिक बाजाराच्या शुभारंभ थाटात करण्यात आला. दुकानदार व ग्राहकांच्या पहिल्याच बाजारात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बाजाराच्या उद्घाटन समारंभाला माजी जि प सदस्य व्यंकटेश कारेमोरे ,शेतकरी नेते संजय सत्येकार, निलज ग्रामपंचायत सरपंच सुनील डोंगरे ,उपसरपंच रामचंद्र चकोले, सचिव विलास नेवारे सह समस्त ग्रामपंचायत सदस्यगण, बाजार समितीचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी दुकानदारांच्या शाल व त्रिफळ देऊन स्वागत करण्यात आला.

उद्घाटनिय साप्ताहिक बाजाराच्या दुकानदार व ग्राहकांच्या प्रतिसाद बघता उद्या बुधवार 25 मार्चला दुसऱ्या साप्ताहिक बाजाराला दुकानदार व ग्राहकांची संख्या वाढणार असल्याचे, निलज येथील नागरिक सांगत आहे.