नागपूर :- मोरया फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी संक्रांत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मीनल हिमने, संध्या कटमुसरे, अनुसया शेळके, लता डायरे उपस्थित होत्या. सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनंतर महिलांनी हळदीकुंकवाच्या उपक्रमात सहभागी होत एकमेकींना शुभेच्छा दिल्या. अनेक सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमात उत्साह भरला. याप्रसंगी महिलांसाठी विविध खेळ व उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या महिलांना मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका व सचिव रजनी चौहान यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी निशिगंधा रामटेके, मनीषा भोयर, सुवर्णा रहाटे, चेतना हिंगे, कांचन भोयर, अनु शेळके, गायत्री खंडाळ, लीना श्रावणकर यांच्यासह संस्थेच्या सर्व महिलांनी सहकार्य केले. निवेदन माधुरी इत्तडवार यांनी तर मनीषा भोयर यांनी आभार मानले.



