नागपूर :- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण,अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री माणिकराव कोकाटे हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 18 सप्टेंबर रोजी दुपारी 4.15 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून रविभवन शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता रविभवन शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता रविभवन, शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने एम्प्रेस पॅलेस हॉल, खसरा क्र.4, वर्धा रोड जामठा स्टेडियम जवळ, परसोडी, नागपूरकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता एम्प्रेस पॅलेस हॉल, खसरा क्र.4, वर्धा रोड, जामठा स्टेडियम जवळ, परसोडी, नागपूर येथे आगमन व एक दिवसीय चिंतन शिबिरास उपस्थिती व राखीव. सायंकाळी 6 वाजता रविभवन विश्रामगृहाकडे प्रयाण. सायंकाळी 6.30 वाजता रविभवन, शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 रोजी रविभवन, शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने विभागीय क्रीडा संकुल, नागपूरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता विभागीय क्रीडा संकुल, नागपूर येथे आगमन व राज्यातील विविध क्रीडा प्रकाराचे खेळाडू, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक, पालक आणि युवकांच्या विविध अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘युवा आणि क्रीडा संवाद’ कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. सायंकाळी 4.30 वाजता विभागीय क्रीडा संकुल येथून रविभवन शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.रविभवन शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.




