किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील सीमेवरील स्थित मौदा तालुका अंतर्गत येत असलेले महालगाव ते जिल्हा भंडारा ,मोहाडी तालुक्यांतर्गत येत असलेल्या सितेपार या दोन जिल्ह्यातील गावांना जोडणाऱ्या सुर नदीवरील पूलाचे काम मागच्या वर्षी सुरु झाले होते. मात्र ठेकेदार व अभियंता यांच्यामधील कमिशनच्या वादातून हे काम बंद झाल्याचे महालगाव येथील शेतकरी भागवत भोयर यांनी सांगितले. नदीपलीकडे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाळ्यात पुलाअभावी शेतात जाण्या येण्यासाठी अत्यंत गैरसोय होत असते त्यामुळे या पुलाचे काम संबंधित प्रशासन विभागाने व लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देऊन तातडीने सुरू करावे अशी कळकळीची मागणी महालगाव येथील शेतकरी भागवत भोयर सह समस्त शेतकरी वर्ग व ग्रामवासी यांनी केली आहे.



