spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खतावरील लिंकिंग (ब्लॅकमेलिंग)बंद करून युरिया उपलब्ध करून देण्यासाठी मौदा तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांचे जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन 

किशोर साहू,मौदा :- सध्या मौदा तालुक्यात नहराला पाणी सुटल्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी त्यांच्या गहू पिकाला नहाराचे पाणी देत आहेत. पाणी दिल्यानंतर गहू पीक जोमात येण्यासाठी युरिया खताची अत्यंत आवश्यकता असते. परंतु सध्या युरिया खत लिंकिंग (ब्लॅकमेलिंग)शिवाय म्हणजेच इतर अनावश्यक वस्तू घेतल्याशिवाय भेटत नसल्याने, इतर अनावश्यक वस्तू घेतल्याशिवाय कंपन्या व डिस्ट्रीब्यूटर युरिया देत नसल्याने, कृषी केंद्र संचालक व शेतकरी कमालीचे त्रस्त झालेले आहे. मात्र आम्ही कृषी केंद्र संचालकांना युरिया खतावर लिंकिंगच्या अनावश्यक वस्तू देत नसल्याच्या उलट्या बोंबा कंपन्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रक प्रकाशित करून करीत आहे.

त्यामुळे सखोल चौकशी करून युरिया खतावरील लिंकिंग(ब्लॅकमेलिंग) तातडीने बंद करून युरिया खत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र मनोहरे यांना मौदा तालुक्यातील कृषी केंद्र संचालक संघटनेचे उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद बरबटे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी ग्रा प निमखेडा चे ग्रा प सदस्य तथा कृषी सेवा केंद्र संचालक पूर्णचंद्रराव वेमूरी, गंगाधर नटीये सह तालुक्यातील कृषी सेवा केंद्र संचालक उपस्थित होते. युरिया खतावरील लिंकिंग बंद न झाल्यास तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र संचालक आंदोलन करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Popular Articles