spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अदानी प्रकल्पाच्या मजुरांना कामावरून कमी करण्याची नोटीस मुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष 

यासीन शेख, गोंदिया तिरोडा :- दिनांक १ मार्च २०२६ ला अदानी पावर लिमिटेड तिरोडा या आस्थापनेमध्ये सर्व कंत्राटदार यांच्या मार्फत लावण्यात आलेल्या करार संपणाऱ्या कंपन्यांनी आपल्या मजुरांना नोटिसात स्वयंरोजगार पहावे बाबत तसेच नवीन कंपनी येत आहे म्हणून नियमित कामगारांना कंपनी बाहेर करण्याची अदानी पावर लिमिटेड तिरोडा मध्ये होणाऱ्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. नवीन कंपनी म्हणजे पावर मेक प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने कोणत्याही कामगाराला कमी न करता आपला काम पुढे कामगाराला नवीन कंपनी समायोजित करावे अशी मागणी कामगारांनी मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांना केली आहे करा संपुष्टात येणाऱ्या कामगारांनी केली आहे.

अदानी प्रकल्पातील विविध आस्थापनांमध्ये (कंपनी) सर्व काम करणाऱ्या कंपन्यांचे करार संपुष्टात येणार आहे. अशा कंपन्यांनी आपल्या मजुरांना नोटीसाद्वारे सुचित करून कंपनीचा काम पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळे करार पूर्ण झाल्याने आता काम शिल्लक राहिलेले नाही तरी मजुरांनी आपल्या सोयीनुसार आपले काम पहावे अशा प्रकारची नोटीस मजुरांना दिली आहे. जुन्या कंपन्यांचे कामाचे करार संपले असले तरी सदर काम नवीन कंपनीला देण्यात येणार आहे.जुन्या कंपनीच्या लोकांना कमी न करता नवीन कंपनी ज्याला काम मिळाला आहे अशा कंपनीने जुन्या सर्व कंपनीमध्ये असलेल्या मजुरांना समाविष्ट करून समाविष्ट करून पुढील काम करावे अशी मागणी मजुरांनी केली आहे याकडे स्थानिक प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन मजुराचे मागण्या मंजूर करावे. असे निवेदन अदानी प्रकल्प व्यवस्थापन व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांना मजुरांच्या वतीने देण्यात आले आहे तरी स त्वरित निर्णय घ्यावे कामगारांना रस्त्यावर उतरून आंदोलने त्रिव आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा सुद्धा दिला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.