किशोर साहू, मौदा :- शनिवार (ता. 12 सप्टेंबर) ला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद आदर्श शाळा घोटमुंढरी येथे आनंददायी शनिवार आणि तान्हा पोळा निमित्त शाळेचे वतीने एक आगळावेगळा वेशभूषा, पोशाख,तान्हा पोळा पारंपारिक पद्धतीने तोरण,पताका लावून पूजन करून थाटामाटात वाजत गाजत प्रभातफेरी काढून करण्यात आला.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक,सर्व शिक्षकवृंद,शाळा व्यवस्थापन समिती,माजी विद्यार्थी संघ,पदाधिकारी, पालक आणि गावकरी यांचे हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शाळेचे वतीने नोटबुक,पेन ,खाऊ,प्रसाद वाटप करून सर्व शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत आनंददायी वातावरणात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्राचे वेगवेगळे पोशाख पेहराव करून सादरीकरण केले आणि याप्रकारे कार्यक्रम पाहून सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रम पाहून उपस्थित पाहुण्यांनी असे प्रेरणादायी कार्यक्रम होणे ही आजच्या काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे शाळेचे सर्व शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती,माजी विद्यार्थी संघ,आजी माजी पदाधिकारी,पालक,गावकरी या सर्वांचे आभार मुख्याध्यापक विकास धारगावे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय पांडे यांनी मानले.





