नागपूर :- नागपूर शहरातील नागरिकांना O.C.W. मार्फत येणारी पाण्याची बिले अत्यंत वाढलेली असून सर्वसामान्य नागरिकांवर याचा मोठा आर्थिक भार पडत आहे. या वाढीव बिलांबाबत तात्काळ दुरुस्ती करावी, तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करावी, या मागण्यांसाठी आज नागपूर महानगरपालिका आयुक्तांना औपचारिक निवेदन देण्यात आले.
निवेदनात खालील प्रमुख मुद्दे मांडण्यात आले,
* पाणी अनियमित आणि वाढीव पाण्याचे बिले तात्काळ रद्द किंवा दुरुस्त करावीत.
* मीटर रीडिंग घेताना पारदर्शकता राखावी .
* ज्या भागात पाणीपुरवठा नियमित नाही, त्या भागांत बिल आकारणी बाबत पुनर्विचार करावा किंवा तक्रारींच्या नोंदी व निवारणासाठी वेगळा हेल्पडेस्क सुरू करावा.
या मागण्यांसह नागपूर महानगरपालिका आयुक्तांकडे नागरिकांचे प्रत्यक्ष प्रश्न आणि तक्रारी मांडण्यात आल्या असून आयुक्तांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.




