कामठी :- प्रभाग 16 गौतम नगर येथील सुबोध सेवकदास चांदोरकर यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष कार्यकारी अधिकारी पदी नुकतीच नियुक्ति करण्यात आली नगर परिषद अध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या हस्ते त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी पदाचे नियुक्ति पत्र देण्यात आले.
शासनाने विशेष कार्यकारी अधिकारीनां शासकीय कामासाठी व रहिवासी प्रमाणपत्र देणे,शासकीय योजनांचा प्रसार,प्रचार व जनजागृती करणे,शासनाच्या सर्वेक्षण, जनगणना, विविध अभियानात मदत करणे, पोलिस प्रशासनास पंचनामा कार्यात मदत करणे आदी तेरा कार्यात सहकार्य करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ति बाबत सुबोध चांदोरकर यांनी महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, संघठन महामंत्री किशोर रेवतकर, नगराध्यक्ष अजय अग्रवाल, भाजपा शहर अध्यक्ष मंगेश यादव, उपाध्यक्ष उज्वल रायबोले यांचे आभार मानले आहे.




