टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत १ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण; कार्यशाळेत माहिती

0
52

नागपूर २८ : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, शहर क्षयरोग कार्यालय, महानगरपालिकेतर्फे टीबी मुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने रा. तो. आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी क्षयरोग संवेदीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अतीजोखीम गटातील १ लाख ४ हजार १३ एवढ्या लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे.

टी.बी. या संसर्गजन्य रोगाला देशातून हद्दपार करण्याच्या दृष्टीकोनातून भारत सरकारच्या वतीने टी.बी. मुक्त भारत अभियान देशात राबवण्यात येत आहे. यासाठी स्थानिक स्तरावर कार्यशाळा, प्रबोधनपर कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान महापालिकेडूनही अभियानांतर्गत कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेला डॉ. व्ही. पी. कन्नन, डॉ. छाया वानखडे, आरएमओ डॉ. एम. बी. देवकते, शिवराज बबेरवाल, ट्रिटमेंट सुपरवायजर दीपक पाटील, लॅब सुपरवायजर उमेश प‌द्मने, जिल्हा समन्वयक हेमंत भाकरे, प्रतीक गाडगे, आकाश मनवर, दिनेश घायवट, विक्रांत वानखडे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक उमेश पद्मने यांनी प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियानांतर्गत निक्षव मित्रद्वारे नांेदणी करुन क्षयरुग्णांना कोरडी धान्याची किट्स वाटप करुन क्षयरुग्णांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. क्षयरुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, प्रयोगशाळा तपासणी, ट्रुनॅट, सिबिनेट तपासणी मोफत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध असून क्षयरुग्णांना एचआयव्ही, डायबिटिक तपासणी तसेच औषधोपचार मोफत असण्याबाबत माहिती दिली. त्याच प्रमाणे एक हजार रुपये निक्षय पोषण आहार योजनेंतर्गत डीबीटी स्वरुपात क्षयरुग्णाच्या बँक खात्यात जमा होत असल्याबाबत सांगितले. १० नागरी आरोग्य केंद्र, १६ आयुष्मान आरोग्य मंदिर, २ आपला दवाखाना आदींमार्फत आहार व स्वयंसेवकांकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अभियान १ जुलै ते ३१ डिसेंबर या कालावधीत शहरात मोहीम राबवण्यात येणार आहे. जोखीमग्रस्त भाग, स्लम भाग, मागील वर्ष आधीचे क्षयरुग्ण त्यांचे संपर्क, संपर्कातील व्यक्ती, तंबाखू, दारू व्यसन करणार तसेच एचआयव्ही संशयित इत्यादी त्याचप्रमाणे दोन आठवड्यापेक्षा सतत येणारा खोकला, दोन आठवड्यातील आधिक कालावधीतील ताप, वजनात लक्षणीय घट, भूक मंदावणे, थंुंकी वाटे रक्त येणे, मानेवर गाठी येणे इत्यादी लक्षणे, तसेच ६० वर्षावरील वयोवृद्ध, डायबिटिक क्षयरुग्ण अशा व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे.

किट्सचे वितरण प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियान अंतर्गत पोषण आहार किट्स वाटप करण्यात येणार आहे. तरी वैयक्तिक, सामाजिक, मंडळे, स्वयंसेवी संस्था या योजनेच्या कोरडी धान्याची किटस वाटप करु शकतात. तसेच दीपक पाटील यांनी क्षयरोग म्हणजे काय, लक्षणे, क्षयरोगाचे प्रकार, उपस्थित सुविधा तसेच क्षयरुग्णांची संस्था याबाबत माहिती देण्यात आली.