spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्मार्ट प्रकल्पांना बांधकाम मंजुरी व फायर ‘एनओसी’बाबत तातडीने कार्यवाही करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

मुंबई :- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध उपप्रकल्पांना बांधकाम मंजुरी व फायर ‘एनओसी’ मिळण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत चंद्रपूर येथील साखरवाही शेतकरी उत्पादक कंपनी (ता. चंद्रपूर) यांना मंजूर प्रकल्प कापूस जिनिंग या स्मार्ट प्रकल्पांमधील प्रलंबित बांधकाम परवानग्या व फायर एनओसीच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आमदार किशोर जोरगेवार, कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे प्रकल्प संचालक प्रदीप चंद्रन, कृषी विभागाचे उपसचिव यू एस.कचरे, साखरवाही शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक नामदेव डाहुली उपस्थित होते.

चंद्रपूर येथील मायक्रोबियल शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रकल्पाची एकूण किंमत ४५९.७९ लाख रुपये असून, त्यासाठी २७५.८७ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रकल्पाला आतापर्यंत २४८.२७ लाख रुपये वितरित करण्यात आले असून अंतिम लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर उर्वरित निधी वितरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हणाले, संबंधित प्रकल्पासाठी आवश्यक असलेली बांधकाम परवानगी व फायर एनओसी मिळण्यास विलंब होणार नाही, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.

स्मार्ट प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण होणे आणि मंजूर निधीचा प्रभावी वापर होणे आवश्यक असून सर्व प्रलंबित प्रशासकीय बाबी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Popular Articles