spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या – हर्षदीप कांबळे

– निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

नागपूर :- नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना निवडणूक निरीक्षक हर्षदीप कांबळे यांनी आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर पदवीधर निवडणुकीसंदर्भात पूर्वतयारीचा आढावा निवडणूक निरीक्षक हर्षदीप कांबळे यांनी घेतला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे -पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद (नागपूर), वान्मथी सी. (वर्धा), सावन कुमार (भंडारा ), मंदार पत्की (गोंदिया), वसुमना पंत (चंद्रपूर), अविष्यांत पंडा (गडचिरोली), पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर आयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप कुलकर्णी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया तसेच निवडणुकीनंतर मतपेट्यांची सुरक्षा, स्ट्रॉंग रूम, वाहतूक नियोजन आदी प्रक्रियेबाबत आढावा घेताना निवडणूक निरीक्षक हर्षदीप कांबळे यांनी निवडणुकीशी संबंधित सर्व प्रक्रियेसंदर्भात आढावा घेतला. गडचिरोली तसेच इतर जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असे निर्देश यावेळी दिले.

पदवीधर निवडणूकीसाठी मतदान दि. २३ ऑक्टोबर रोजी तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी यांनी यावेळी दिली. मतदानासाठी मनुष्यबळ, मतदान केंद्र येथील तयारी, स्ट्रॉंगरूमची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आदी तयारीबाबत सविस्तर माहिती बिदरी यांनी यावेळी दिली.

निवडणूक निरीक्षक हर्षदीप कांबळे यांच्या निवासाचा पत्ता

नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक म्हणून हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती केली आहे. कांबळे यांचा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवासाचा पत्ता कॉटेज नंबर ७, रवी भवन, नागपूर असा असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८२०८५४०१९० असा आहे.

Popular Articles