spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला विद्यालयात आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम

यवतमाळ :- महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत,जिल्हा कार्यालयाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिला विद्यालय, यवतमाळ येथे विद्यार्थिनींसाठी आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उपाध्ये, पर्यवेक्षिका कुडमेथे, अमृतचे जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा तसेच जिल्हा कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात डॉ. वैशाली सुश्रुत लुले यांनी विद्यार्थिनींना शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ, स्त्री आरोग्य आणि स्त्रीरोगविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुलींनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी, आरोग्यविषयक समस्यांबाबत जागरूक कसे राहावे आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व कसे समजून घ्यावे, याविषयी त्यांनी माहिती दिली.

विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. अमृतच्या सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी निलेश टिकले यांनी आभार मानले.

Popular Articles