spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

२० ऑक्टोबर ला जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन

– जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिनाच्या निमित्ताने हाडांच्या ठिसूळपणाबाबत जनजागृती करणारे प्रबोधनात्मक गीत डॉ. संजीव चौधरी सादर करणार

नागपूर :- दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन साजरा केला जातो. हाडे ठिसूळ होण्याचा हा आजार अनेकदा हाड मोडेपर्यंत लक्षात येत नसल्याने त्याला ‘मूक मारेकरी’ असेही म्हटले जाते. विशेषतः रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये तसेच वाढत्या वयातील पुरुषांमध्ये या आजाराचा धोका वाढतो. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी डॉ. संजीव चौधरी व डॉ. वैशाली चौधरी यांच्या लेखणीतून साकारलेले, मोरेश्वर निस्ताने यांच्या सुमधुर स्वरांनी सजलेले आणि हर्षा वेखंडे यांच्या निवेदनाने नटलेले प्रबोधनात्मक गीत सादर करण्यात आले आहे. कॅल्शियम व जीवनसत्त्व ‘ड’युक्त आहार, नियमित व्यायाम, योग्य जीवनशैली आणि वेळेवर निदान यांद्वारे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करता येतो. या जागतिक दिनानिमित्त हाडांच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Popular Articles