spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अंजना फाऊंडेशनच्या वतीने सिलेगाव येथे भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न २४० नागरिकांची मोफत तपासणी; ३१४ जणांना चष्मे वाटप

हंसराज, भंडारा सिलेगाव :- नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून अंजना फाऊंडेशन, तुमसरच्या वतीने सिलेगाव येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने आयोजित या शिबिराचा परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिरात नागपूरच्या लता मंगेशकर हॉस्पिटलचे संयोजक प्रशांत फुले, उदापुरे सर व तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने रुग्णांची तपासणी केली. यात त्वचारोग, हृदयरोग, अस्थिरोग तसेच कान, नाक व घसा यांसारख्या विविध आजारांवर २४० ग्रामस्थांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच दृष्टीदोष असलेल्या ३१४ नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर मोतियाबिंदू आढळलेल्या ४० रुग्णांवर लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथे पुढील मोफत उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

याप्रसंगी नागपूरचे प्रशांत मिश्रा व दृष्टीतज्ज्ञ संजय लहाने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी अंजना फाऊंडेशनचे प्रा. अमोल उमरकर, अंकुश गभने, सरपंच यशवंत उपरिकर यांच्यासह बाल शारदा उत्सव मंडळाचे पदाधिकारी गणेश मारबदे, रंजीत कटारे, राकेश सार्वे, संजय पेरे, सुजित पेरे, ज्ञानेश्वर उके, धनलाल रहांगडाले, शैलेश मते आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular Articles